आपण असे अनेक पदार्थ खातो ज्याचा आपल्या यकृतावर परिणाम होतो.
लिव्हर हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. यामुळे आपले संपूर्ण आरोग्य सुरळीत राहते. लिव्हर आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
एका अहवालानुसार लिव्हर खाल्लेल्या अन्नातून पोषक तत्व शोषून घेते आणि इतर अवयवांपर्यंत पोहोचवते. नियमितपणे आपण असे अनेक पदार्थ खातो ज्यामुळे लिव्हरचे आरोग्य बिघडते.
अल्कोहोल आपल्या लिव्हरला हानी पोहोचवते. यात असणारे घटक आरोग्यासाठी हानिकारक असतात.
बर्गर, पिझ्झा, चिप्ससारखे प्रक्रिया केलेले पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असतात.
साखरेचे पदार्थ लिव्हरला हानी पोहोचवतात. ज्यामुळे शरीरातील चरबी वाढते, त्यासाठी साखरेचे पदार्थ कमी खावेत.
प्रक्रिया केलेले मांस शरीरासाठी हानिकारक असते. मांस, हॅम्बर्गर, हॉट डॉगमध्ये वापरले जाते. जे आपल्याला शरीरात फॅट वाढवते.
लिव्हर स्वच्छ करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवे.