मुलींच्या शर्टला खिसा का नसतो? यामागे फॅशन आणि सामाजिक कारणं आहेत का?
खिसा म्हणजे फक्त वस्तू ठेवण्याची जागा नाही, तर तो एक सोयीस्कर पर्याय आहे.
सुरुवातीच्या काळात, पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या कपड्यांना खिसे असायचे.
१९व्या शतकात स्त्रियांनी खिशे वापरणे बंद केले, कारण ते त्यांच्या कपड्यांचे सौंदर्य कमी करतात असे मानले जाऊ लागले.
स्त्रियांच्या कपड्यांना खिशे न लावण्यामागे व्यावसायिक कारणही सांगितले जाते. कारण, त्यामुळे त्यांना हँडबॅग खरेदी करावी लागत असे.
फॅशन डिझाइनर्सच्या मते, खिसा स्त्रियांच्या शरीराचा नैसर्गिक आकार बिघडवतो.
पण, आता ही फॅशन जुनी झाली आहे. अनेक आधुनिक महिलांना त्यांच्या कपड्यांमध्ये खिसे हवे आहेत.
कपड्यांमध्ये खिसे नसणे हा स्त्रियांच्या अधिकारांवर परिणाम करणारा मुद्दाही मानला जातो.
आज अनेक ब्रँड्स पुन्हा स्त्रियांच्या कपड्यांमध्ये खिशे देत आहेत.
त्यामुळे आता स्त्रियांच्या कपड्यांना खिसा असणे ही एक सामान्य गोष्ट बनत आहे.