रिकाम्या पोटी लिंबू पाणी का पिऊ नये?

रिकाम्या पोटी लिंबू खाल्ल्याने किंवा त्याचे पाणी प्यायल्याने पोटात जळजळ होऊ शकते आणि ॲसिडिटीची समस्या वाढू शकते.

ज्यांना आधीच गॅस किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे अधिक हानिकारक ठरू शकते.

लिंबातील आंबटपणामुळे दातांचे 'इनॅमल'कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे दातांमध्ये झिणझिण्या येणे किंवा सेन्सिटिव्हिटी वाढण्याचा धोका असतो.

ज्यांना पोटाचे विकार लवकर होतात, त्यांना रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेतल्यास पोटात दुखणे किंवा गोळा येण्यासारखे त्रास होऊ शकतात.

अल्सर किंवा गॅस्ट्रायटिसची समस्या असलेल्या लोकांसाठी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू घेणे नुकसानदायक ठरू शकते.

लिंबाचे जास्त सेवन केल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते आणि डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.

Click Here