केसांच्या आरोग्यासाठी गरम पाणी की थंड?

गरम पाण्याने केस धुणे सुखद वाटत असले तरी, ते केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

अति गरम पाण्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात.

गरम पाण्यामुळे टाळूची छिद्रे उघडतात आणि केसांची मुळे कमकुवत होतात, ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते.

गरम पाण्यामुळे टाळूची त्वचा कोरडी पडते,परिणामी कोंडा  होतो आणि डोक्याला सतत खाज सुटू शकते.

गरम पाणी केसांच्या बाहेरील आवरणाला नुकसान पोहोचवते, ज्यामुळे केस दुभंगणे आणि गुंता होण्याचे प्रमाण वाढते.

जर तुम्ही केसांना कलर केला असेल, तर गरम पाण्यामुळे तो रंग लवकर निघून जातो आणि केसांची चमक कमी होते

Click Here