ब्राऊन राइस की व्हाईट राइस? कोणता तांदूळ चांगला


पांढरा तांदूळ (White Rice) आणि ब्राऊन राइस (Brown Rice) यांमधील फरक आणि फायदे पाहूया.

पांढरा तांदूळ आणि ब्राऊन राइसमधील मुख्य फरक त्यांच्या प्रक्रियेत (Processing) आहे. पांढरा तांदूळ हा पॉलिश केलेला असतो.

पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राइसमध्ये फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते.

पांढरा तांदूळ हा मऊ आणि चवीला हलका असतो, तर ब्राऊन राइस खाताना थोडा कडक लागू शकतो.

ब्राऊन राइस रक्तातील साखरेचे प्रमाण हळूहळू वाढवतो, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी तो अधिक चांगला पर्याय मानला जातो.

पांढरा तांदूळ शरीरात लवकर पचतो आणि झटपट ऊर्जा देण्याचे काम करतो.

ज्या लोकांना बद्धकोष्ठता (Constipation), गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांना ब्राऊन राइसमुळे काही प्रमाणात अस्वस्थता जाणवू शकते.

आरोग्य आणि पोषण मूल्यांचा विचार करता ब्राऊन राइस उत्तम आहे, परंतु ज्यांना पचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी पांढरा तांदूळ सोयीचा ठरू शकतो.

Click Here