आंघोळीसाठी बेस्ट साबण कोणता? 

आपल्या त्वचेनुसार आंघोळीसाठी कोणता साबण निवडायला हवा, जाणून घेऊया. 

आपण दररोज आंघोळीसाठी साबण वापरतो पण त्वचेसाठी चांगला साबण कोणता? 

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. कोरड्या, तेलकट किंवा संवेदनशील त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण असतात. 

जर आपली त्वचा कोरडी असेल तर ग्लिसरीन किंवा शिया बटरसारखे मॉइश्चरायझिंग घटक असलेले साबण निव़डा. 

तुमची त्वचा तेलकट असेल तर असा साबण निवडा जो जास्तीचे तेल काढून टाकेल. 

आपली त्वचा संवेदनशील असेल तर कमी रसायने असलेला सौम्य किंवा सुगंध नसलेला साबण वापरावा. 

साबणातील सल्फेट्स आणि पॅराबेन्ससारखी रसायने त्वचेसाठी हानिकारक असतात. 

ग्लिसरीन, शिया बटरसारखे घटक असलेले साबण त्वचेला मॉइश्चरायझ करतात, ज्यामुळे त्वचा मऊ होते. 

पीएच-संतुलित साबण त्वचेचे नैसर्गिक संरक्षण राखून जळजळ कमी करतात. 

त्वचेसाठी सौम्य किंवा सुगंध नसलेले साबण वापरणे चांगले.

Click Here