ड्रॅगन फ्रुट्सचे फायदे वाचाल तर रोज खाल...
ड्रॅगन फ्रुटमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्व आणि खनिज आहेत.
यामध्ये व्हिटॅमिन सी चे समृद्ध स्त्रोत असून शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
यात व्हिटॅमिन बी २ आणि बी ३ आढळते, जे शरीराच्या चयापचयासाठी आवश्यक आहे.
यात असणारे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
ड्रॅगन फ्रुटमध्ये भरपूर फायबर असते जे पचनसंस्था निरोगी ठेवून बद्धकोष्ठतासारखी समस्या टाळते.
कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिजे देखील यात आढळतात, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबर जास्त असते. ज्यामुळे वजन कमी होते.
यातील घटक रक्तातील पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.