त्वचेसाठी उपयुक्त ठरणारे पदार्थ .नक्की खा. रोज एक पदार्थ त्वचा ठेवेल सुंदर.
त्वचेवर डाग, पुरळ, मुरुम आणि पिंपल्स सारखे येतात त्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे जीवनसत्त्व 'ई' कमतरता. त्वचेसाठी हे जीवनसत्त्व फारच जास्त महत्त्वाचे असते.
आहारात काही पदार्थ घेतल्याने शरीरातील जीवनसत्त्व 'ई' वाढते आणि त्यामुळे त्वचाही सुंदर होते. यातील एक कोणताही पदार्थ रोज खा.
सुर्यफूलाच्या बिया खाणे आरोग्यासाठी फार फायद्याचे असते. बाजारात आरामात मिळतात रोज थोड्या बिया खा. त्वचेसाठी फारच फायद्याच्या असतात.
बदाम जेवढे स्मरणशक्तीसाठी चांगले तेवढेच त्वचेसाठीही चांगले असतात. त्यात जीवनसत्त्व 'ई' भरपूर प्रमाणात असते