आता ट्रेन्ड 'मंगळसूत्र ब्रेसलेट'चा!

गळ्यात नाही तर आता मनगटावर;'ऑफिस वेअर'साठी मंगळसूत्र ब्रेसलेट ठरतेय बेस्ट

मंगळसूत्र ब्रेसलेट हे पारंपारीक मंगळसूत्राचे एक अधुनिक आणि स्टायलिश रूप आहे.

नोकरी करणाऱ्या किंवा आधुनिक जीवनशैली असलेल्या स्त्रियांसाठी मंगळसूत्र ब्रेसलेट हा एक उत्तम पर्याय ठरत आहे.


यामध्ये गळ्यातील मंगळसूत्राप्रमाणेच काळे मणी आणि सोन्याचे मणी गुंफलेले असतात.

हे ब्रेसलेट केवळ सोन्यातच नाही, तर हिरे , चांदी आणि रोज गोल्डमध्येही उपलब्ध आहेत.

गळ्यात जड मंगळसूत्र घालण्याऐवजी हातामध्ये हलके ब्रेसलेट घालणे अधिक सोयीचे असते, जे कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर (फॉर्मल किंवा कॅज्युअल) शोभून दिसते. 

आजकाल मंगळसूत्र ब्रेसलेटमध्ये मध्यभागी लहान पेंडंट किंवा 'इव्हिल आय' (Evil Eye) सारखे फॅशनेबल घटकही जोडले जातात.

Click Here