सर्वात जवळच्या व्यक्तीलाही 'या' ६ गोष्टी कधीच सांगू नका...

आपल्याबद्दलच्या कोणत्या खास ६ गोष्टी कधीच कुणाला सांगू नये किंवा कुणाशी शेअर करू नये...

आपल्या आयुष्यात विश्वास, नाती आणि संवाद खूप महत्त्वाचे असतात. पण काही गोष्टी अशा असतात ज्या कुणाशीही शेअर करणं आपल्या स्वतःच्याच नुकसानाचं कारण ठरू शकतं. जाणून घ्या अशाच ६ खास गोष्टी.

तुमच्यातील भीती, कमतरता किंवा दुखऱ्या आठवणी प्रत्येकासमोर उघड करू नका. चुकीच्या व्यक्तीकडे ही माहिती गेली तर ती तुमच्याविरुद्ध वापरली जाऊ शकते.

तुमचं उत्पन्न, बचत, कर्ज किंवा गुंतवणूक याबद्दल सगळ्यांशी बोलणं टाळा. आर्थिक गोष्टी खासगी ठेवल्याने गैरसमज आणि मत्सर टाळता येतो.

 पती-पत्नी किंवा जवळच्या नात्यांतील वाद तिसऱ्या व्यक्तीकडे नेऊ नका. बाहेरच्यांचा हस्तक्षेप नातं अधिक बिघडवू शकतो.

 तुमची भविष्यातील मोठी स्वप्नं प्रत्येकाला सांगू नका, आधी ती पूर्ण होऊ द्या नंतरच शेअर करणं केव्हाही चांगलं.

आयुष्यातील अत्यंत खासगी प्रसंग आणि केलेल्या चुका किंवा जुने संघर्ष वारंवार शेअर करणे टाळा, समोरचा याचा वापर भविष्यात  तुमच्याविरुद्ध करू शकतात.

तुम्ही केलेले दान, कोणाला केलेली आर्थिक मदत किंवा चांगले सामाजिक कार्य यांचा गाजावाजा करू नका.

प्रत्येक गोष्ट शेअर करणं हेच प्रामाणिकपणाचं लक्षण नाही. काही गोष्टी मनात ठेवल्यानेच आत्मसन्मान, सुरक्षितता आणि मानसिक शांतता टिकून राहते.

Click Here