सूर्य नमस्कार, कमी वेळेत जास्त कॅलरीज बर्न करण्याचा सोपा उपाय...
शरीराला सुडौल आणि लवचिक बनवण्यासाठी 'सूर्य नमस्कार' हा एक उत्तम 'फुल बॉडी वर्कआऊट' मानला जातो.
सूर्य नमस्कार हा १२ योगासनांचा एक संच आहे, जो संपूर्ण शरीराला ॲक्टिव्ह ठेवतो.
नियमित सूर्य नमस्कार घातल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
एका सूर्य नमस्कारात साधारण १० ते १४ कॅलरीज बर्न होऊ शकतात.
१० सूर्य नमस्कार घातल्यास अंदाजे १०० ते १४० कॅलरीज बर्न होऊ शकतात.
३० मिनिटे सूर्य नमस्काराचा सराव केल्यास जवळपास २०० ते ३५० कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळू शकते.
दररोज सूर्य नमस्कार केल्याने पोटावरील आणि शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते.
सूर्य नमस्कारामुळे शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हात, पाय, पाठ, पोट आणि खांदे अशा संपूर्ण शरीरावर सूर्य नमस्काराचा परिणाम होतो.
सूर्य नमस्कारासोबतच श्वसनक्रिया होत असल्याने ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते.