सोनम कपूरने बेबी बंप फ्लॉंट करत केले सुंदर फोटोशूट!

बॉलिवूडची 'फॅशनिस्टा' आणि अभिनेत्री सोनम कपूर वयाच्या चाळिशीत दुसऱ्यांदा आई होण्याचा अनुभव घेणार आहे.

बॉलिवूडची स्टाइल आयकॉन सोनम कपूर, वयाच्या चाळीशीत दुसऱ्यांदा आई होण्याच्या आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

तिने तिच्या बेबी बंपसोबत ग्लॅमरस फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती ट्रेडीशनल आणि मॉडर्न असे तिचे दोन्ही खास लूक दाखवत आहे. 

या खास क्षणाचे सेलिब्रेशन करत सोनमने नुकतेच बेबी बंप फ्लॉंट करणारे शानदार फोटोशूट केले आहे.या फोटोशूटमध्ये ती नेहमीप्रमाणेच स्टायलिश आणि मॉडर्न दिसत आहे.

इंस्टाग्राम अकाउंटवर गुडन्यूज शेअर करत तिने तिच्या बेबी बंपचे सुंदर फोटो पोस्ट केले. फोटोंसोबत तिनं फक्त एक शब्द लिहिला, 'मदर'.

 तिच्या प्रेग्नेंसी लुकमध्ये सोनम पुन्हा एकदा फॅशन आयकॉन म्हणून दिसली, तिने गुलाबी रंगाचा एलिगंट सूट घातला आहे.

यासोबतच, तिने तिच्या दुसऱ्या लुकमध्ये ऑफ व्हाईट रंगाचा सुंदर असा अनारकली ड्रेस घातला होता सोबत गळ्यात हेव्ही नेकलेस घातला होता. 

यासोबतच, कानांत हेव्ही झुमके आणि हातात त्यालाच मॅचिंग अशा बांगड्या घातल्या होत्या. 

सोनमच्या चेहऱ्यावर आईपणाची एक वेगळीच चमक दिसत आहे.

या फोटोशूटमध्ये सोनमने बेबी बंप फ्लॉंट करत आपली नेहमीची हटके स्टाईल अगदी बिनधास्तपणे दाखवली आहे.

Click Here