जास्त प्रमाणात चहा प्यायल्यानं काय होतं, जाणून घ्या.
आपल्या सकाळच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. चहा प्यायल्याने आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळते.
दिवसभरात आपण ५ ते ६ कप चहा पितो, पण चहा दिवसांतून किती वेळा प्यायला हवी? जाणून घ्या.
डॉक्टरांच्या मते दिवसातून २ ते ३ कप चहा पिणे पुरेसे असते.
जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने कॅफिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे निद्रानाश, अपचन आणि पोटाच्या तक्रारी वाढतात.
रात्री उशीरा चहा पिणे टाळावे, कारण यामुळे झोपत व्यत्यय येऊ शकतो.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं आम्लपित्त किंवा अॅसिडिटी होण्याची शक्यता वाढते.
खूप जास्त प्रमाणात चहा प्यायल्यानं रक्तदाब, हृदयगती आणि श्वसनाच्या गतीत वाढ होते, ज्यामुळे शरीरावर ताण येतो.