संत्री खाऊन झाल्यानंतर आपण साल फेकून देतो. पण यापद्धतीने तिचा पुन्हा वापर करु शकतो.
संत्र्याच्या सालीला उन्हात वाळवून त्याचा पावडर तयार करा. ज्यामुळे नॅचरल फेसपॅक तयार होईल.
हा पावडर दही आणि गुलाबजलमध्ये मिसळून त्वचेला लावल्यास त्वचा उजळण्यास मदत होईल.
या पावडरला टूथपेस्टमध्ये मिसळून दात साफ करण्यास मदत होते.
संत्र्याची साल खोलीत ठेवा. ज्यामुळे सुगंध पसरुन हवा ताजी राहिल.
संत्र्याची साल पाण्यात उकळून केसांना लावल्याने केस चमकदार होतात आणि कोंडा देखील कमी होतो.
कपडे किंवा शूजमधून दुर्गंध येत असेल तर त्याच्या आत ठेवा. ज्यामुळे वास कमी होईल.