अनेकदा आपल्या आवडीची नेलपॉलिश सुकते, अशावेळी सोपी ट्रिक वापरा.
बरेचदा आपल्या आवडीचे नेलपॉलिश बाटलीत सुकते किंवा त्याचा जाड थर होतो, ज्यामुळे ती पुन्हा वापरता येत नाही.
पण काही सोप्या ट्रिक्सने आपण पुन्हा नेलपॉलिश वापरु शकतो.
नेलपॉलिश जाड झाली असेल तर त्यात नेलपॉलिश रिमूव्हचे काही थेंब घाला.
मिश्रण पातळ होण्यासाठी बाटली चांगली हलवा.
यासाठी आपण नेलपॉलिश थिनर देखील वापरु शकतो, ज्यामुळे पॉलिश गुळगुळीत होते.
बाटली काही वेळ कोमट पाण्यात ठेवल्याने जाड नेलपेंट मऊ होते.
नेलपॉलिश थंड किंवा कोरड्या जागी ठेवल्याने ते लवकर सुकत नाही.
या सोप्या ट्रिक्सच्या मदतीने नेलपॉलिश पुन्हा वापरु शकता.