आहारातील साखर कमी करण्यासाठी ७ टिप्स

आहारातील साखर कमी करण्यासाठी काय करायला हवं? 

आहारातील साखर कमी करणे हे केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही, तर मधुमेह, हृदयविकार आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. 

आपण कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फ्रूट ज्यूस ऐवजी लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी किंवा साधे पाणी पिण्याची सवय लावा. 

साखर बंद करण्याऐवजी त्याचे प्रमाण हळूहळू कमी करा. दिवसातून ३ ते ४ वेळा चहा-कॉफी पिणं बंद करा. 

गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा नैसर्गिक पदार्थ खा. फळे, बेदाणे, खजूर खा. 

केचप, बिस्किटे, सॉस आणि योगर्टमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते, ते खाणं टाळा. 

पास्ता, व्हाईट ब्रेड, पिझ्झा आणि बेकरीसारख्या पदार्थांऐवजी आपण नाचणी, ज्वारी, ओट्सचा आहारात समावेश करायला हवा. 

आहारात प्रथिन्यांचा समावेश करा, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहिल. 

Click Here