उन्हाळ्यात तुळशीचे रोप सुकू नये म्हणून ५ टिप्स

उन्हाळा सुरु झाला की माती कोरडी होते अशावेळी तुळशीच्या रोपाची काळजी कशी घ्यावी पाहूया.

उन्हाळ्यात तुळशीला दुपारी पाणी घालणे टाळावे. सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर पाणी द्या.  ज्यामुळे मातीतील ओलावा जास्त काळ टिकून राहतो.

दुपारचे कडक ऊन तुळशीच्या पानांसाठी घातक असते. रोपाला सकाळी ऊन द्या, त्यानंतर सावलीत ठेवा.

कुंडतील माती लगेच कोरडी पडू नये म्हणून मातीवर सुका पालापाचोळा किंवा नारळाच्या शेंड्यांचा थर द्या.

तुळशीला मंजिरी आली की रोपाची वाढ थांबते आणि ते सुकू लागते. रोपाला मंजिरी आली की काढून टाका.

उन्हाळ्यात तुळशीला कीड लागण्याची शक्यता असते. यावेळी आठवड्यातून एकदा कडुनिंबाचे तेल पाण्यात मिसळून कुंडीत घाला.

उन्हाळ्यात तुळशीला खूप जास्त खत घालू नका. रासायनिक खताचा रोपावर परिणाम होतो.

Click Here