उन्हाळ्यात ओठांचा काळपटपणा वाढला असेल तर काय करावं?
ओठांच्या काळेपणामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. पण काही घरगुती उपाय केल्यास आराम मिळतो.
रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर तूप किंवा खोबऱ्याचे तेल लावल्याने ओठांमधील ओलावा टिकून राहतो आणि काळेपणा दूर होतो.
साखर आणि मधाने हलक्या हाताने घासल्याने मृत त्वचा हळूहळू निघून लागते आणि ओठ स्वच्छ व सुंदर दिसू लागतात.
जास्त प्रमाणात चहा आणि कॉफी प्यायल्याने ओठांचा काळेपणा वाढू शकतो.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ लवकर कोरडे पडतात आणि काळे होऊ लागतात.
नियमित काळजी घेतल्यास ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग परत मिळवता येतो.