आपण रोज किती चमचे हळद खायला हवी, याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो. वाचा सविस्तर
भारतीय स्वयंपाकघरात हळद अधिक महत्त्वाची मानली जाते. आयुर्वेदातही हळदीला बहुगुणी मानण्यात आले आहे. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन विविध आरोग्याच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
हळदीमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्वचा उजळवणे, पचन सुधारण्यास मदत करतात.
एक चमचा हळदीमध्ये अंदाजे १७०-१९० मिलीग्राम कर्क्यूमिन असते. आपण दिवसाला ४०० ते ८०० मिलीग्राम कर्क्यूमिन घेऊ शकता. म्हणजे दिवसभरात १ ते ३ चमचे हळद खाऊ शकता.
जास्त प्रमाणात हळदीचे सेवन केल्यास गॅस, उलट्या, यकृताचे नुकसान किंवा त्वचेला संसर्ग होऊ शकतो.
गर्भवती महिलांनी हळदीचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जास्त प्रमाणात हळद खाल्ल्याने नुकसान होईल.
लहान मुलांसाठी पाऊण चमचा आणि मोठ्यांसाठी अर्धा चमचा हळद दिवसाला पुरेशी आहे.
हळदीचे दूध पित असाल तर झोपण्यापूर्वीची वेळ अतिशय योग्य आहे.