टाळूला खाज सुटते? ५ उपायांनी मिळवा आराम

डोक्यात कोंडा, टाळूला खाज लागत असेल तर ५ उपाय करुन पाहा. 

Heading 3

ऋतू कोणताही असला तरी आपल्या डोक्यात सतत खाज सुटते. यामुळे अनेकदा आपल्याला काही सुचत नाही. डोक्यात उवा, कोंडा, ऍलर्जी, त्वचेचे विकार किंवा इतर आरोग्य समस्यांमुळे खाज येऊ शकते.

टाळूला खाज येत असेल तर ती खाज कमी करण्यासाठी आपल्याला खोबऱ्याचे तेल लावायला हवे. 

डोक्यात कोंडा झाला असेल तर टी ट्री ऑइल वापरु शकता. त्यात अँटी-फंगल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. जे टाळूची खाज कमी करतात. 

अॅपल सायडर व्हिनेगर हे देखील टाळू कोरडी पडत असेल तर त्यावर लावू शकतो. 

टाळूला खाज लागत असेल तर कोरफडीचा गर लावा. यामुळे टाळू स्वच्छ होण्यास मदत होते. 

कडुलिंबाचे तेल आपण टाळूला लावून टाळूची खाज रोखू शकतो. त्यात आढळणारे पोषक घटक खाज कमी करतात. 

टाळूला खाज येत असेल तर दही आणि लिंबू लावू शकता. यामुळे टाळूची खाज कमी होऊ शकते. 

Click Here