आपण अनेकदा 'हेल्दी' समजून काही पदार्थ खातो, परंतु ते पदार्थ आरोग्यासाठी फारसे हेल्दी नसतात.
ग्रॅनोल बार्स, डाएट बिस्किट्स किंवा पॅकेज्ड फ्रूट ज्यूस खरंतर हेल्दी वाटत परंतु मुळात ते हेल्दी नसतात.
डाएट करताना व्हेजिटेबल चिप्स हेल्दी म्हणून खातो पण त्यात मीठ व तेलाचे प्रमाण अधिक असल्याने ते हेल्दी नसतात.
लो - कॅलरीज म्हणून अनेक पदार्थ विकले जातात परंतु त्यात मीठ, साखर व इतर आर्टिफिशियल पदार्थ अधिक प्रमाणात असतात.
डाएटमध्ये ग्लूटेन फ्री पदार्थांचा समावेश आपण करतो परंतु त्यात ग्लूटेन हे थोड्याफार कमी प्रमाणात असतेच.
मल्टीग्रेन ब्रेड हेल्दी असले तरी ब्रेड तयार करण्यासाठी त्यात थोडाफार मैद्याचा वापर हा केलाच जातो.
पॅकेजिंग केलेले फ्रुट ज्यूस हेल्दी नसून त्यात आर्टिफिशियल रंग, स्वीटनर्स व साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
एनर्जी बार्समध्ये फायबर व प्रोटीनच्या तुलनेत साखरेचे प्रमाण अधिक असते ज्याने वजन वाढू शकते.
डाएट सोडा किंवा कोल्डड्रिंक्स मध्ये आर्टिफिशियल रंग, स्वीटनर्स व साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.