गॅस, अ‍ॅसिडिटी होऊ नये म्हणून 'या' पद्धतीने प्या चहा... 

चहा प्यायल्यानंतर गॅस आणि अ‍ॅसिडिटी होऊ नये म्हणून चहा पिण्याची योग्य पद्धत माहीत असणे गरजेचे असते.

अनेकांना चहा प्यायल्यानंतर छातीत जळजळ, गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. पण, चहा सोडण्याची गरज नाही तज्ज्ञांनी चहा पिण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.


चहामध्ये टॅनिन असते, जे रिकाम्या पोटी पिल्याने पचनसंस्थेवर परिणाम करते. तसेच, जास्त प्रमाणात साखर आणि दुधाचा वापर केल्यानेही अ‍ॅसिडिटी वाढते.


सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी चहा पिऊ नका. यामुळे पोटात अ‍ॅसिड तयार होते आणि दिवसभर त्रास होऊ शकतो. 

चहा पिण्यापूर्वी किंवा चहा सोबत, नेहमी काहीतरी खा. यामुळे अ‍ॅसिड पचनसंस्थेत शोषले जाते.

चहामधील साखर पूर्णपणे टाळा किंवा खूप कमी करा. चहामध्ये आले किंवा वेलची यांसारखे नैसर्गिक पाचक मसाले वापरा.


सकाळी नाश्त्यानंतर १ तास किंवा सायंकाळी ४ ते ५ दरम्यान चहा पिणे उत्तम. जेवणाच्या आधी किंवा नंतर चहा पिणे टाळा, यामुळे पोषणावर परिणाम होतो.

चहा पिण्याआधी पाण्याचे २ ते ३ घोट पिऊन मगच चहा प्यावा,  यामुळे गॅस, अ‍ॅसिडीटीचा त्रास होणार नाही.

Click Here