केळी खाल्ल्याने वजन कमी होतं का? 

रोज केळी खाल्ल्यावर वजनावर कसा परिणाम होतो पाहूया. 

केळीमध्ये फायबर भरपूर असतात. यामुळे आपले पोट बराच वेळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही. 

थोड्या हिरव्या किंवा कच्च्या केळीमध्ये रेझिस्टंट स्टार्च असतो. हा स्टार्च पचायला वेळ घेतो. ज्यामुळे शरीरातील फॅट बर्निंगची प्रक्रिया वेगाने होते. 

व्यायामापूर्वी केळी खाल्ल्याने शरीराला चांगली ऊर्जा मिळते. त्यामुळे वर्कआउटपूर्वी केळी खा. 

आपल्या गोड खाण्याची इच्छा होत असेल तेव्हा चॉकलेटऐवजी केळी खा. 

एका केळीमध्ये १०० ते ११० कॅलरीज असतात. दिवसाला १ ते २ केळी खाणे पुरेसे आहे. 

रात्री उशिरा केळी खाणे टाळावे, कारण रात्री आपली पचनसंस्था मंदावलेली असते.

साधे केळे किंवा ओट्ससोबत केळे खाणे फायद्याचे आहे.

Click Here