एव्हरग्रीन धर्मेंद्र! सदाबहार अ‍ॅक्शन आणि रोमान्सचा बादशाह... 

बॉलीवूडमध्ये अनेक हिरो आले आणि गेले, पण काही नावं काळाच्या पलीकडे जातात, त्यापैकीच एक नाव म्हणजे — धर्मेंद्र!

सिनेमाच्या पडद्यावर ज्या अभिनेत्याच्या एंट्रीने ॲक्शनचा धुरळा उडाला, तर सोबतच त्याच्या नजरेतील रोमान्सने लाखो चाहत्यांना वेड लावलं, तो एकच... बॉलिवूडचा 'ही-मॅन' धर्मेंद्र!

हँडसम लुक, दमदार अ‍ॅक्शन, आणि मोहक स्माईलने प्रेक्षकांची मने जिंकणारा हा एव्हरग्रीन हिरो आजही ‘सदाबहार अ‍ॅक्शन आणि रोमँसचा बादशाह’ म्हणून ओळखला जातो.

हिंदी सिनेमात पदार्पण करताच धर्मेंद्र यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं.

‘शोले’, ‘धरमवीर’, ‘कातिलों का कातिल’ यांसारख्या चित्रपटांनी धर्मेंद्र यांना ‘ही-मॅन ऑफ बॉलीवुड’ बनवलं. स्वतः स्टंट करणारा तो त्या काळाचा खरा अ‍ॅक्शन हिरो!

फूल और पत्थर’, ‘चुपके चुपके’, ‘आन मिलो सजना’ या चित्रपटांमधील त्यांचा रोमँटिक अंदाज आजही प्रेक्षकांचे मन जिंकतो. 

पडद्यावर ते जितके रोमाँटिक दिसतात, तितकेच ते रिअल लाईफमध्ये 'फॅमिली मॅन' आहेत. हेमा मालिनींसोबतची त्यांची जोडी आजही आयकॉनिक मानली जाते.

धर्मेंद्र यांना फिल्मफेअर, लाईफटाईम अचिव्हमेंट यांसारख्या वेगवेगळ्या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

धर्मेंद्र या अष्टपैलू अभिनेत्याने ॲक्शन आणि रोमान्सच्या जोरावर 'बॉलिवूडचा बादशाह' म्हणून आपले स्थान आजही टिकवून ठेवले आहे.

Click Here