स्क्रीनमुळे डोळ्यांची जळजळ होत असेल तर 'हे' नक्की करा
मोबाईल किंवा स्क्रीन पाहिल्यामुळे येणारा थकवा आणि जळजळ काकडीच्या थंडपणामुळे कमी होते, डोळ्यांना आराम मिळतो.
काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने डोळ्यांभोवतीच्या त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते
काकडीमध्ये अँटीइन्फामेटरी गुणधर्म असतात, जे डोळ्यांखालील सूज कमी करण्यास मदत करतात.
काकडीतील सिलिका आणि व्हिटॅमिन K डोळ्यांभोवतीची त्वचा उजळण्यास आणि ब्लॅक सर्कल कमी करण्यास मदत करतात.
नियमित वापरामुळे डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
काकडीचे दोन गोल काप करून ते १०-१५ मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर डोळे बंद करून हे थंड काप डोळ्यांवर १० ते १५ मिनिटं ठेवा.