बॉलिवूडमध्ये अशा काही जेष्ठ अभिनेत्री आहेत ज्यांचं वय वाढलं तरी, अभिनयाची आवड त्यांनी कायम जोपासली.
त्यांच्या अभिनयाची ताकद, उत्साह, स्टाईल, व्यक्तिमत्वाची जादू आजही तितकीच सदाबहार आहे.
कामिनी कौशल ९८ वर्षांच्या असून या बॉलिवूडच्या ज्येष्ठ आणि अनुभवी अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्या अजूनही चित्रपटांमध्ये अॅक्टिव्ह दिसतात.
५० - ६० च्या दशकात अतिशय लोकप्रिय असलेल्या वैजयंती माला ९१ वर्षांच्या असून त्यांनी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं.
माला सिन्हा या ८८ वर्षांच्या असून बॉलिवूडमधील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्रींपैकी एक आहेत.
शुभा खोटे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, त्या ८८ वर्षांच्या आहेत.
वहीदा रहमान सध्या सुमारे ८७ वर्षांच्या आहेत, त्या बहुगुणी अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात.
८० वर्षांच्या सायरा बानो, बॉलिवूडच्या लोकप्रिय आणि उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहेत.
८६ वर्षांच्या हेलन, त्यांचा ग्रेसफूलनेस, एनर्जी आणि खास नृत्यशैलीमुळे त्या “क्वीन ऑफ कॅबरे” म्हणून ओळखल्या जातात.
८४ वर्षांच्या बिंदू यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायिका, वॅम्प आणि कॉमेडी रोल्स करुन अफाट लोकप्रियता मिळवली.
इंद्राणी मुखर्जी, वयवर्ष सुमारे ९९ वर्षे. त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्रींपैकी एक. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आई, बहीण आणि सपोर्टिंग रोल्स साकारले.
८२ वर्षांच्या अशा पारेख, नृत्यकौशल्य, सुंदर हास्य व बिनधास्त अभिनयामुळे आजही प्रेक्षकांच्या मनामनांत आहेत.
८१ वर्षांच्या तनुजा, त्यांचा खोडकर, जिवंत आणि नैसर्गिक अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
हिंदी आणि बंगाली सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित अभिनेत्री असलेल्या शर्मिला टागोर ८० वर्षांच्या आहेत.