काळे मनुके की पिवळे? कोणते मनुके जास्त फायदेशीर

मनुके खाण्याचे फायदे आणि काळ्या व पिवळ्या मनुक्यांमधील फरक समजून घ्या.

मनुक्यांमध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शिअम, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

काळे मनुके (Black Raisins) हे नैसर्गिकरित्या सुकवले जातात. यामध्ये पिवळ्या मनुक्यांच्या तुलनेत लोह, प्रथिने आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते.

पिवळे मनुक्यात (Yellow Raisins) फायबरचे प्रमाण अधिक असते, जे पचनशक्ती सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करते.

पोषण मूल्यांचा विचार करता, काळे मनुके पिवळ्या मनुक्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि फायदेशीर मानले जातात.