भारती सिंगने वजन कमी करण्यासाठी कोणताही कडक डाएट किंवा व्यायाम न करता साध्या आणि सोप्या पद्धतींचा अवलंब केला.
तिने आपल्या जेवणाची वेळ निश्चित केली होती आणि ती कधीही चुकवत नव्हती.
तिने बाहेरचे अन्न पूर्णपणे टाळले आणि फक्त घरगुती जेवण खाल्ले, ज्यात डाळ, भात, तूप आणि पराठे यांचा समावेश होता.
भारतीला खाण्याची खूप आवड आहे, पण तिने खाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले.
तिने चांगली झोप घेतली आपल्या जीवनशैलीत बदल केला.
तणावामुळे वजन वाढू शकते, त्यामुळे ती शक्य तितके तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करत होती.