किडनीला निरोगी ठेवण्यासाठी हे पदार्थ आठवड्यातून एकदा तरी खावे.
ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.
फ्लॉवर हे किडनीचे रक्षण करते. किडनीच्या त्रास होत असणाऱ्यांने ही भाजी खावी, यात अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे किडनीसह हृदयाचे आरोग्य सुधारते.
कोबी ही कमी पोटॅशियम असलेली भाजी आहे. यात असणारे व्हिटॅमिन सी आणि फायबर किडनीसाठी चांगले आहे.
लसूणमध्ये दाहक विरोधी गुणधर्म अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे किडनीसाठी फायदेशीर आहे.
ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलीफेनॉल भरपूर असतात.
अननसात फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण कमी असते. यात ब्रोमेलन असते जे जळजळ कमी करते. आणि किडनीसाठी चांगले आहे.