दूध तापवण्याची योग्य पद्धत कोणती? 

दूध तापवताना अनेकदा ते उतू जात किंवा फाटते. त्यासाठी दूध उकवळण्याची योग्य पद्धत पाहा. 

जर आपल्याला दुधावरची साय नको असेल तर उकळवण्यापूर्वी चाळणीने गाळून घ्या. 

दूध जळू नये असं वाटतं असेल तर स्टील किंवा जाड पातेल्याचे भांडे वापरा. 

दूध मंद आचेवर गरम करा, जास्त आचेवर ते जळू शकते. 

दूध खाली लागू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा. 

दूध उकळू लागताच, मंद आचेवर २ ते ३ मिनिटे राहू द्या. 

उकळल्यानंतर दूध थंड होण्यासाठी झाकून ठेवा ज्यामुळे धूळ किंवा कीटक त्यात जाणार नाही. थंड झाल्यानंतर दुधाचे पातेल फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे ते जास्त काळ फ्रेश राहिल. 

Click Here