केसगळती रोखण्यासाठी आणि लांबसडक केसांसाठी खा ६ पदार्थ.
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. जे केसांच्या मुळांना आतून पोषण देण्याचे काम करते. यामुळे केसगळती थांबते.
सूर्यफुलांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे टाळूतील रक्तप्रवाह सुधारतो. ज्यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होते.
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक असते, ज्याचा थेट संबंध केसांच्या वाढीशी आणि दुरुस्तीशी आहे. त्यासाठी नियमितपणे या बिया खायला हव्या.
तिळामध्ये कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात, जे केस मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असतात.
चिया सीड्समध्ये प्रथिने आणि ओमेगा ३ भरपूर प्रमाणात असतात. जे केसांच्या वाढीस मदत करतात.
केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर केला जातो. यात लोह आणि प्रथिने भरपूर असतात. जे केसांना मुळापासून मजबूत करतात.
आपल्या केसांची वाढ ही फक्त त्यांना काय लावतो यावर अवलंबून नसतो आहारात काय खातो हे देखील महत्त्वाचे आहे.