आपली त्वचा चमकण्यासाठी आहारात कोणते पदार्थ असायला हवे पाहूया.
मेकअपमुळे बाह्य सौंदर्य वाढते पण त्वचेसाठी आतील सौंदर्य अधिक महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्याला आहारात काही पदार्थांचा समावेश करणं महत्त्वाचं.
आपल्याला आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करावा लागेल, ज्यामुळे त्वचा चमकण्यास मदत होईल.
किवी हे व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. हे कोलेजन निर्मितीला चालना देण्यास मदत करते.
पेरु खाल्ल्याने त्वचेवरील काळे डाग कमी होण्यास मदत होते.
गोजी बेरी खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात, ज्यामुळे त्वचेला चमक मिळते.
चिया सीड्समुळे हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत होते.
अॅव्होकॅडोमध्ये असणारे घटक त्वचेला मऊ, मुलायम आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात.
ग्रीक योगर्टमध्ये प्रथिने आणि प्रोबायोटिक्स घटक असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारुन त्वचेची गुणवत्ता वाढवतात.