उन्हाळ्यात तुळस सुकू नये म्हणून मातीत घाला 'हे' खतं 

वाळलेली तुळस पुन्हा हिरवीगार होण्यासाठी मातीत कोणतं खतं घालावं पाहूया. 

तुळशीची पाने पिवळी पडत असतील आणि रोप सुकत असेल तर हे पोषक तत्वांची कमतरता, जास्त पाणी देणे किंवा काळजी न घेतल्यामुळे होते. 

केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हे खतं म्हणून मातीत घातल्यास मुळे मजबूत होतात. 

सगळ्यात आधी केळीच्या साली पूर्णपणे वाळवा, नंतर त्याची पावडर करुन पाण्यात मिसळून द्रव खत तयार करा. 

हे द्रावण आठवड्यातून एकदा तुळशीच्या मुळांना द्या, यामुळे झाडाला आवश्यक पोषण मिळते. 

ओल्या साली मातीत टाकल्यास झाडाला बुरशी लागते, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. 

तुळशीला रोज ४ ते ५ तास सूर्यप्रकाश मिळायला हवा. माती कोरडी असल्यावर त्यात पाणी घाला. 

योग्य काळजी घेतल्यास आणि काही घरगुती उपाय केल्यास तुळस काही दिवसांत पुन्हा हिरवीगार आणि ताजी दिसण्यास मदत होईल. 

Click Here