उन्हाळ्यात उसाचा रस पिणे फायदेशीर आहे का?
उसाच्या रसात नैसर्गिक साखर असते, जेव्हा आपल्याला थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो, तेव्हा उसाचा रस प्यावा.
उसाचा रस यकृतासाठी चांगला मानला जातो. कावीळ झालेल्या लोकांसाठी उसाचा रस फायदेशीर आहे.
उसाचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होतात.
उन्हाळ्यात लघवीची जळजळ होणे किंवा किडनी स्टोन यांसारख्या समस्या टाळण्यासाठी उसाचा रस प्यावा.
उसाचा रस प्यायल्याने मुरुमे कमी होण्यास मदत होतात आणि त्वचा चमकते.
मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.