बाळंतपणात वाढलेलं वजन आलिया भट्टने 'असं' केलं कमी... 

कोणतेही क्रॅश डाएट न करता आरोग्यपूर्ण व नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणे हा आलियाचा मुख्य हेतू होता.

 विचारपूर्वक खाणे, कोणतेही कठोर नियम न पाळणे आणि वजनकाट्यावर सतत लक्ष न ठेवणे हे तिने वेटलॉस करताना कटाक्षाने पाळले. 

बाळंतपणानंतर सहा आठवड्यांसाठी, आलियाने डिंकाचे लाडू खाल्ले. हे तिच्या रिकव्हरी डाएटचा एक महत्वाचा भाग होते.

आलिया तिच्या डाएटमध्ये सॅलॅडसोबत डाळ - भात, भाजी आणि ज्वारी किंवा नाचणीची भाकरी अशा पारंपरिक पदार्थांचा समावेश करते. 

आलिया डाएटमध्ये शक्यतो ताजी फळे, भाज्या, कडधान्ये यांचा समावेश करते, ज्यामुळे ताकद आणि पोषण मिळते.

आलिया कोणतेही पदार्थ खाताना 'पोर्शन कंट्रोल' करते. ती पौष्टिक पदार्थ योग्य प्रमाणांत खाते. वेटलॉससाठी ती उपाशी राहात नाही, आणि जास्त खातही नाही.

आलिया भट्ट तिचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करते.

आहार असो वा व्यायाम, आलियाचे असे मत आहे की, शरीराचे ऐकून त्याच्या गरजेनुसार वागणे महत्त्वाचे आहे.

योग्य डाएट आणि एक्सरसाइज फॉलो करून आलियाने बाळंतपणात वाढलं वजन केलं झटपट व नैसर्गिक पद्धतीने कमी.

Click Here