चोंदलेले नाक मोकळे करणारे ७ उपाय 

फारच जास्त सर्दी असेल तर करा हे उपाय. पटकन आराम मिळेल. तसेच नाकही साफ होईल. 

सर्दी झाल्यावर नाक चोंदते. नाकातून सारखी सर्दी वाहत राहते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि हैराण व्हायला होते. 

काही साधे घरगुती उपाय करणे फायद्याचे ठरते. पावसाळ्यात तर सर्दी नसतानाही हे उपाय करा. काहीही त्रास होणार नाहीत. 

वाफ घेणे श्वसनमार्गासाठी फायद्याचे असते. त्वचेसाठीही चांगले असते. गरम पाण्यात तुळस घाला, कोबी घाला नक्कीच फायद्याचे ठरते.

सतत गरम पाणी प्यायचे. चहा, कॉफीपेक्षा काढा प्या. तुळशीचा काढा, दालचिनी घालून काढा असे पेय प्या. 

हात आणि चेहरा स्वच्छ ठेवायचा. हातामुळे जंतू नाकातोंडात जातात त्यामुळेही सर्दी वाढते. हात सारखे धुवायचे.

मस्त गरमागरम आणि तिखट - झणझणीत पदार्थ खायचे. त्यामुळे नाक साफ होते. घसाही साफ होतो. 

झोपताना डोक्या खाली जरा जाड उशी घ्यायची. त्यामुळे झोपल्यावर सारखे नाक वाहत नाही. मऊ उशीमुळे सर्दी उलट्या दिशेने जाते आणि ठसका लागतो.

जर एसी वापरत असाल, तर कितीही उपाय करा सर्दी बरी होत नाही. त्यामुळे एसी , पंखा जरा कमी वापरा. 

जीवनसत्व 'सी' असलेले पदार्थ खा. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गाचे प्रमाण कमी होते. 

Click Here