मुलांसाठी 'हे' ७ पदार्थ जणू विषच! 

मुलांना चुकूनही खाऊ घालू नका हे पदार्थ, शरीरासाठी असतात हानिकारक 

सध्याच्या काळाच मुलांच्या आरोग्यासह त्यांच्या आहाराची काळजी घेणे देखील अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुलांना कोणते पदार्थ खाऊ घालू नये पाहूया. 

मुलांना जंक फूड्स अधिक आवडते. चिप्स, कँडी, पॅक केलेले पदार्थ आणि कुकीज त्यांना खाऊ घालू नका. 

साखरेचे पदार्थ आणि पेय मुलांना देऊ नका. त्याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. 

मुलांना रेड मीट कमी प्रमाणात द्या. हे पचवण्यास अधिक जड असते. 

त्यांच्या आहारात मीठाचे प्रमाण देखील कमी असायला हवे. अन्यथा त्यांच्या रक्तदाबावर परिणाम होतो. 

मुलांना कच्चे दूध आणि अंडी देणे टाळा. यामुळे पचनसंस्था बिघडू शकते. 

कॅफिनचे पदार्थ मुलांच्या आहारात नसायला हवे. त्यांच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. 

१२ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आहारात मध नसायला हवे. यात असणारे बॅक्टेरिया आरोग्यावर परिणाम करतात. 

Click Here