हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारासोबतच डाएटमध्ये फळांचा समावेश करणे देखील तितकेच महत्वाचे असते.
रोजच्या आहारात काही फळांचा समावेश केल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते, रक्तदाब संतुलित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
अशी कोणती ७ फळं आहेत जी हृदयाचं आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी विशेष फायदेशीर ठरतात.
केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. केळं खाल्ल्याने हृदयविकारांचा धोका कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
सफरचंदामध्ये फायबर, पेक्टिन आणि व्हिटॅमिन 'सी' जास्त प्रमाणात असते, जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
एवोकाडोमध्ये व्हिटॅमिन ई, फायबर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
संत्र्यामध्ये फ्लॅवोनॉइड्सही भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते.
द्राक्षांमध्ये रेसव्हेराट्रॉल नावाचा अँटिऑक्सिडंट असतो, जो बॅड कोलेस्टेरॉल कमी करतो. तसेच हृदयाशी संबंधित अनेक समस्यांमध्येही फायदेशीर ठरते.
पेरमध्ये भरपूर फायबर असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. यामध्ये पेक्टिन नावाचे घटक असतात, जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.
अननसामध्ये ब्रोमेलिन व व्हिटामिन 'सी' भरपूर असते. जे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात व गुड कोलेस्टेरॉल वाढवतात यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.