वजन घटवणारी ७ 'मॅजिक' पेये!

सकाळी रिकाम्या पोटी कोणती पेय प्यायल्याने वजन कमी होते पाहूया.

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यायला हवे. यामुळे शरीर डिटॉक्स होते. 

रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे भिजवा. आणि सकाळी हे पाणी गाळून प्या. 

ओवा नैसर्गिकरित्या पचनशक्ती वाढवतो. एक चमचा ओवा पाण्यात उकळवून ते पाणी प्या. 

रात्री भिजवलेले मेथी दाण्याचे पाणी सकाळी गाळून ते पाणी प्यावे. यामुळे सतत भूक लागणार नाही. 

एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर उकळा आणि पाणी कोमट झाल्यावर त्यात मध घालून प्या. 

दोन चमचे कोरफडीचा गर आणि दोन चमचे आवळा रस एक ग्लास पाण्यात मिसळून प्या. 

सकाळी आपण केळी आणि ओट्सची स्मूदी देखील पिऊ शकतो. 

Click Here