केसांचे आरोग्य शाम्पू किंवा तेलावर अवलंबून नसते. तर आहारावर आणि शरीरातील पोषक तत्वांवर जास्त अवलंबून असते. केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी ६ महत्त्वाची व्हिटॅमिन्स कोणते पाहूया.
व्हिटॅमिन बी-७ मध्ये बायोटिनचा स्त्रोत आहे. हे शरीरात केराटिन तयार करण्याचे काम करते. आहारात आपण अंडी, बदाम, शेंगदाणे, अक्रोड आणि पालेभाज्या खा.
टाळूला ओलावा देण्यासाठी व्हिटॅमिन ए ची गरज असते. केसातील कोरडेपणा कमी करण्यासाठी गाजर, रताळे, भोपळा, दूध आणि दही खा.
व्हिटॅमिन सी मध्ये अँटी-ऑक्सिडंट आहे. केस पांढरे होत असतील तर आहारात आवळा, संत्री, लिंबू, पेरू आणि स्ट्रॉबेरी खा.
व्हिटॅमिन डी मुळे केसांच्या नवीन मुळांची निर्मिती होण्यास मदत होते. शरीरात व्हिटॅमिन डी कमी असल्यास केस मोठ्या प्रमाणात गळू शकतात.
व्हिटॅमिन ई मध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे डोक्याच्या त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते. आहारात सूर्यफुलाच्या बिया, बदाम, पालक आणि एवोकॅडो खा.
बी-१२ हे रक्तातील लाल पेशी तयार करण्यास मदत करते, ज्या केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण पोहोचवतात. यासाठी आहारात दूध, पनीर, अंडी आणि मांसाहारी पदार्थ खा.