उन्हाळ्यात मेकअप करण्यापुर्वी काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या. जेणेकरून बराच वेळ मेकअप फ्रेश राहील.
उन्हाळ्यात मेकअप करण्यापुर्वी तुमच्या चेहऱ्यावर थंडगार पाणी शिंपडा किंवा मग बर्फाचा तुकडा रुमालात गुंडाळून त्वचेवर फिरवा.
उन्हाळ्यात ऑईल बेस मॉईश्चरायजर वापरणे टाळा. त्याऐवजी जेल बेस माॅईश्चरायजर वापरा. त्वचा तेलकट होणार नाही.
चेहऱ्यावर ज्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात जास्त घाम येतो तिथे प्रायमर लावायलाच हवं.
उन्हाळ्यात मेकअप अगदी लाईट करावा. खूप हेवी मेकअप केल्याने त्वचेवर पॅचेस दिसतात.
क्रिम बेस्ड प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी पावडर बेस्ड मेकअप प्रोडक्ट वापरायला हवे. त्यामुळे चेहरा तेलकट होत नाही.