दातांचा पिवळेपणा कमी करून त्यांना अधिक मजबूत करायचं असेल तर या काही गोष्टी रोज करायला हव्या..
दिवसातून दोन वेळा ब्रश करायला विसरू नका. दात स्वच्छ ठेवण्यासाठी ते गरजेचं आहे.
चहा- काॅफी जास्त प्रमाणात प्यायल्यामुळेही दात पिवळे होतात. त्यामुळे ते कमीतकमी प्रमाणात प्या.
थंड पदार्थ पिताना शक्यतो स्ट्रॉ चा वापर करा. यामुळे दातांना ठणका लागत नाही.
सफरचंद, पेर, पेरू अशी क्रंची फळं दातांनी बारीक चावून खा. यामुळे दात स्वच्छ, पांढरेशुभ्र आणि मजबूत होतात.
जेवण, नाश्ता झाल्यानंतर आठवणीने चूळ भरून दातांमध्ये अडकलेले पदार्थ स्वच्छ करा.