त्वचेचं तारुण्य आणि सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी नियमितपणे करा.
चुकीच्या आहाराचा परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे घरचं सकस, पौष्टिक अन्न खा. त्वचा छान राहील.
सकाळी उठल्यानंतर, बाहेरून घरात आल्यानंतर, रात्री झोपण्यापुर्वी चेहरा धुवा. यामुळे त्वचेवर घाण साचून राहात नाही.
चेहऱ्याला नियमितपणे मॉईश्चराजर, टोनर लावण्यास विसरू नका. टोनर म्हणून गुलाबजल उत्तम आहे.
घराबाहेर पडण्यापुर्वी सनस्क्रिन अवश्य लावा. यामुळे प्रखर सुर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं.
पुरेशा प्रमाणात पाणी प्या. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहाते, शरीरातले टॉक्झिन्स पाण्यासोबत फ्लश आऊट होतात. त्याचा चांगला परिणाम त्वचेवर दिसून येतो.