फक्त ५ टिप्स- चेहऱ्यावरचा ग्लो कमी होणारच नाही...
चेहऱ्यावरचा ग्लो कमी होऊ द्यायचा नसेल तर पुढे सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करायला विसरू नका...
शेहनाज हुसैन सांगतात की चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी ऑईल पुलिंग खूप उपयुक्त ठरतं. यासाठी सकाळी खोबरेल तेल तोंडात घेऊन ते आतल्याआत फिरवा. यामुळे शरीरातले टॉक्झिन्स बाहेर पडण्यास मदत होते.
त्रिफळा चुर्ण थोड्या पाण्यात उकळवून घ्या. त्यानंतर हे पाणी चेहऱ्याला लावा. ते एखाद्या टोनरप्रमाणे काम करतं. त्वचा घट्ट होण्यास मदत करतं.
थोडीशी हळद घ्या. त्यात खोबरेल तेल किंवा दही घालून हा लेप चेहऱ्याला लावा. चेहऱ्यावर छान चमक येते.
रात्री झोपण्यापुर्वी खोबरेल तेल, तूप किंवा कॅस्टर ऑईलने चेहऱ्याला मसाज करा.