मुलांनी आपलं सगळं ऐकावं, आपल्याला मान द्यावा असं पालकांना नेहमीच वाटतं..
पण त्यासाठी पालकांनी काही गोष्टी करण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न केले पाहिजेत. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा..
पहिली गोष्ट म्हणजे मुलांसमोर कोणत्याही बाबतीत चुकूनही खोटं बोलू नका. तरच ते तुमच्याकडून खरेपणा शिकतील.
मुलांनी आपलं ऐकावं असं वाटत असेल तर तुम्हीही त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची सवय स्वत:ला लावा...
चारचौघांसमोर किंवा मुलांच्या मित्रमैत्रिणींसमोर त्यांना अजिबात रागावू नका किंवा वाईट बोलू नका.
टीव्ही, मोबाईल बघत वेळ घालवणं आधी तुम्ही कमी करा. तुम्ही सतत कामात राहिलात तर मुलं तुमच्याकडे पाहून मेहनत करायला शिकतील.
मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घ्या, त्यांच्या आवडीच्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना तुम्ही जास्त जवळचे वाटू लागाल.