शरीराची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी काही व्यायाम करणं गरजेचं आहे. हे व्यायाम केल्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.
पहिला व्यायाम म्हणजे बालासन. यामुळे मनावरचा ताण कमी होण्यासही मदत होते.
दुसरा व्यायाम आहे कॅट- काऊ पोज. यामुळे पाठीच्या कण्याचा व्यायाम होतो.
अधोमुख श्वानासन केल्यामुळे पोटऱ्या, मांड्या, पाठ, दंड या सगळ्यांनाच छान स्ट्रेचिंग होते.
विपरित करणी हा व्यायाम केल्यामुळे मन शांत होते आणि पोटऱ्या दुखण्याचा त्रासही कमी होतो.
धनुरासन केल्यामुळे पाठीचा कणा आणि पोट यांचा व्यायाम होतो. त्यांच्यावर ताण येऊन त्या भागातली लवचिकता वाढते.