हाडं कुरकुरायला लागली असतील तर त्यांच्यामधलं कॅल्शियम कमी झालं आहे. त्यामुळे काही पदार्थ नियमितपणे खायला लगेच सुरुवात करा.
दुधामधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. त्यामुळे आहारातले दुधाचे प्रमाण वाढवा.
पनीरसारखे दुग्धजन्य पदार्थही तुमच्या आहारात असायला हवे. त्यांच्यातूनही कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळते.
चिया सीड्समधून कॅल्शियम तर मिळतेच पण त्यासोबतच त्यांच्यामधून काही प्रमाणात प्रोटीन्सही मिळतात.
राजगिराही कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत मानला जातो.
शरीरातले कॅल्शियम वाढण्यासाठी भोपळ्याच्या एखाद्या चमचा बिया नियमितपणे खाल्ल्यानेही खूप फायदा होतो. .
पांढरे तीळ नियमितपणे खा. ते फक्त संक्रांतीपुरतेच मर्यादित न ठेवता रोज एखादा चमचा तरी खायला हवेत..