आपल्याला कोणता आजार आहे किंवा आपल्या शरीरात कोणत्या घटकांची कमतरता आहे हे चेहरा आरशात पाहून लगेच ओळखता येतं..
त्यामुळे स्वत:चा चेहरा आरशात एकदा नीट निरखून पाहा आणि तुमच्या तब्येतीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या..
जर तुमच्या चेहऱ्यावर काळसर डाग दिसत असतील तर व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२, लोह तुमच्या शरीरात कमी असून हार्मोन्सचे असंतुलनही आहे.
चेहरा पिवळसर झाक असणारा किंवा डल, निस्तेज दिसत असेल तर किडनीशी संबंधित काही त्रास असू शकतो.
चेहऱ्यावर नेहमीच सूज दिसत असेल तर किडनी किंवा थायरॉईडचा त्रास असू शकतो.
शरीरात जर झिंक, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए कमी प्रमाणात असेल तर त्वचेवर ॲक्ने दिसू शकतात.
ओठ नेहमीच कोरडे पडलेले असतील, ओठांचे साल निघत असतील तर ओमेगा ३, व्हिटॅमिन ई कमी असू शकतात. किंवा थायरॉईड, डायबिटीस असे त्रास असू शकतात.
पीसीओएस किंवा मधुमेह टाईप २ असेल तर मान काळी पडत जाते.