झोप कमी झाली तर मेंदूच चालणार नाही. पाहा काय होते झोपेच्या अभावामुळे.
किती झोपतेस? उठ आणि अभ्यासाला बस असे कोणी तुम्हाला पुन्हा ओरडून सांगायला लागले तर त्यांना झोपेचे महत्व नक्की समजावून सांगा.
झोपेने मेंदूला गंज धरतो ही मान्यता अगदी चुकीची आहे. अर्थात आळशीपणाची झोप नाही तर शरीराला गरजेची असलेली ८ ते ९ तासाची झोप महिलांना मिळायलाच हवी.
रात्रीची शांत झोप आणि बौद्धिक कार्यक्षमता यांचा थेट संबंध असतो. मेंदूला आराम मिळाल्यावर तो पुन्हा नव्याने काम करतो. झोपेचा अभाव असेल तर मेंदूला त्रास होतो.
झोपेमुळे लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. पटकन विसरण्याची सवय अनेकांना असते. हा विसरभोळेपणा झोपेच्या अभावामुळे वाढतो. त्यामुळे स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी झोप हवी.
व्यवस्थित झोपणारे लोक जास्त जलद आणि प्रभावी काम करु शकतात. कारण त्यांचा मेंदू तेवढा कार्यशील असतो. त्याला गरजेचा आराम मिळाला असतो.
मात्र अतिझोपेचा परिणाम उलटाही होतो. तसेच झोपेच्या तासांप्रमाणेच वेळही महत्त्वाची असते. रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे.
दुपारी पाच मिनिटे पाठ टेकवणे मेंदूसाठी उपयुक्त ठरते. दिवसभर काम केल्यावर जरा दहा ते पंधरा मिनिटांचा ब्रेक तर नक्कीच घ्यायला हवा.
झोप पुढे ढकलत मोबाइल पाहू नका. त्यामुळे मेंदूवर फार वाईट परिणाम होतात. झोपण्यापूर्वी मोबाइल पाहू नका. डोळ्यांना आराम द्या.
झोपेचा अभाव असल्यास, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती दोन्ही कमी होते. तसेच त्याचा मानसिक आरोग्यावर भयंकर परिणाम होतो.