बदाम खूप आरोग्यदायी असले तरी काही लोकांसाठी मात्र ते त्रासदायक ठरू शकतात.
त्यामुळे कोणता त्रास असणाऱ्या लोकांनी बदाम खाणं टाळायला हवं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते खायला हवे ते पाहा..
बदाममध्ये हेल्दी फॅट्स असले तरी त्यातून कॅलरीही जास्त मिळतात. त्यामुळे वेटलॉस करणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बदाम खावे.
बदामामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे ज्या लोकांना पचनाच्या समस्या असतात त्यांना पोट फुगणे, गॅसेस होणे असा त्रासही होऊ शकतो.
ज्यांना ॲलर्जीचा त्रास असतो अशा लाेकांनाही बदाम खाल्ल्याने अंगावर खाज येणे, शिंका येणे, रॅश येणे असा त्रास होऊ शकतो.
बदाममध्ये ऑक्झालेट जास्त प्रमाणात असते. त्यामुळे किडनीस्टोनचा त्रास असणाऱ्यांनी बदाम खाण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.